नवरदेवाला पाहताच भर मंडपात नवरीने धरला ठेका अन् मग…; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | जगभरातील अनेक वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. व्हायरल होणारे हे व्हिडीओ केव्हा आपल्याला चांगली शिकवण देऊन जातात तर केव्हा आपलं मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर तुमचं मनोरंजन करणारा असाच एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुमच्या देखील चेहऱ्यावर नक्कीच अलगद हास्य उमटेल.

लग्न म्हटलं की वधू आणि वर हे प्रमुख आकर्षण असतात. सर्वांच्या नजरा या वधू वरावरच खिळून असतात. या दोघांना पाहण्यासाठी सर्व पाहुणेमंडळी जमलेले असतात. अशाच एका लग्नातील नवरीने आपल्या हटके अंदाजाने सर्व वऱ्हाडींची मने जिंकली आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लग्न चालल्याचं समजत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू आपल्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसह वरातीची वाट पाहत आहे. नवरीची नजर नवरदेवाला शोधत आहे.

नवरीच्या नजरेस जसा का नवरदेव पडतो तसा तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. नवरदेव नजरेस पडताच नवरी त्याला जवळ बोलावते आणि मग नवरदेव आणि नवरी बॉलीवूड मधील ‘खलनायक’ या चित्रपटातील ‘पालकी मे होके सवार में’ या गाण्यावर डान्स करु लागतात.

नवरदेव आणि नवरीचा हा डान्स पाहून वऱ्हाडी मंडळी खूप खूश होतात आणि ते देखील वधूवरासोबत गाण्यावर ठेका धरतात. यावेळी मंडपातील वातावरण आणखी खुलतं.

दरम्यान, वधूवराच्या डान्सचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. रुची प्रजापती मलानिया नावाच्या तरुणीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत 16 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजलं नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खूश होत आहेत. तसेच या नवरीचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.

https://www.facebook.com/ruchimalaniya/videos/2140893146050465

महत्वाच्या बातम्या –

राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड सीन सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हनी सिंगच्या पत्नीचा सासऱ्यावर धक्कादायक आरोप! म्हणाली, नशेत त्यांनी माझ्या स्तनांना…

प्रेग्नंसी दरम्यानचा ‘सेक्स लाईफ’बद्दल करीनाचा मोठा खुलासा; म्हणाली, त्यावेळी सैफ खूप…

कौतुकास्पद! आयसीयूमध्ये अभ्यास करत शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर

माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ