वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणाले,’अरे हा तर दुसरा विराट’

मुंबई | केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिकाच्या संघामध्ये शेवटचा सामना खेळला जात आहे. यावेळी अनुष्काने मुलगी वामिकाला कडेवर घेतली होते. यावेळी वामिका देखील आपल्या बाबाला चेअर करतान दिसली.

वामिकाचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर ( Virat Kohli Daughter Vamika first picture) व्हायरल होत आहे. यामध्ये वामिकाचा क्यूटनेस एकदम ओव्हरलोड आहे.

पहिल्यांदा वामिका अशी टीव्हीवर दिसली आहे. आजपर्यंत वामिकाचा चेहरा कोणी पाहिलेला नाही. पहिल्यांदा ती अशी कॅमेऱ्यासमोर आली आहे. काही दिवसापूर्वीच अनुष्का आणि विराटने मुलगी वामिकाचे फोटो किंवा व्हिडीओ न केल्याबद्दल मीडिया आमि पापाराझींचे आभार मानले होते. नुकताच वामिकाचा पाहिला वाढदिवस झाला आहे.

या वाढदिवसाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वामिकाच्या जन्मापासून विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता.

विराट आणि अनुष्काने वेळोवेळी फोटोग्राफर्सना वामिकाचे फोटो न काढण्याचे आवाहन होते. पण केपटाऊनमध्ये सुरु असणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान विराट आणि अनुष्काच्या मुलीची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.

वामिकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तीचा फोटो सर्वसमोर आला आहे. वामिकाचा फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांना आनंद झालेला पाहायला मिळतच आहे. अनेक नेटकऱ्यांनी अनुष्का आणि विराटचे बालपणीचे फोटो देखील कोलाज करुन सोशल मीडियावर टाकले आहेत.

काही वर्षांपूर्वी अनुष्काने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती हसताना दिसली होती. या फोटोत अभिनेत्री क्यूट दिसत होती. त्याचप्रमाणे विराट कोहलीही त्याच्या बालपणीच्या छायाचित्रात बर्गर खाताना दिसत आहे.

वामिकाचा पहिला फोटो पाहून काही चाहत्यांना आनंद झाला, तर विराट आणि अनुष्काच्या परवानगीशिवाय फोटो शेअर केल्याबद्दल काही चाहते ब्रॉडकास्टरवर नाराज झाले. मात्र या विप्रकरणी राट आणि अनुष्काकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

“पटोलेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज, ते काँग्रेसला संपवल्याशिवाय राहणार नाही” 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; आजपासून ‘या’ गोष्टी पुन्हा सुरू होणार 

“ज्याची बायको पळून गेली, त्याचं नाव मोदी ठेवलं” 

“…मग बघू कोण सरस ठरत ते”; उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना आव्हान 

 “मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे आणि तलवार जरी हातात नसली तरी…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा