नवी दिल्ली | आजपासून आयपीएल 2021 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामुळे सर्वत्र सध्या क्रिकेटचाच माहौल बनला आहे. आयपीएलच्या यंदाच्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडिअन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या लढतीनं झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील हा महामुकाबला चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे.
अशातच सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. राहुलचा हा व्हिडीओ पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील हैराण झाला आहे.
विराटने स्वतः राहुलचा हा व्हिडीओ ट्वीटरवरून शेअर केला आहे. राहुल द्रविडला या अवतारात केव्हाच पाहिलं नव्हतं, असं कॅप्शन विराटने या व्हिडीओवर दिलं आहे. विराटने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर खूप वेगानं व्हायरल होत आहे.
विराटने शेअर केलेल्या हा व्हिडीओ एका जाहिरातीचा आहे. या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहुल द्रविडला राग अनावर झाला आहे. त्याचा पारा खूप चढलेला दिसत आहे.
या जाहिरातीमध्ये राहुल ट्रॅफिकमध्ये अडकलेला दिसत आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल समोरच्या गाडीला आपली गाडी धडकवतो. तसेच शेजारच्या गाडीच्या काचा बॅटने फोडतो. या जाहिरातीमध्ये राहुल ‘इंदिरानगर का गुंडा हूं में’ असं देखील म्हणताना दिसत आहे.
राहुल द्रविड हा भारतीय संघातील सर्वांत शांत खेळाडूंपैकी एक खेळाडू समजला जातो. आजवर केव्हाच राहुलला क्रिकेटच्या मैदानात राग आल्याचं पाहिलं नाही. त्यामुळे ही जाहिरात राहुलच्या स्वभावाच्या पूर्ण विरुद्ध असल्याचं लोक बोलत आहेत.
राहुल द्रविडचं हे रूप पाहून त्याचे चाहते खूप हसत आहेत. तसेच त्याचे केव्हा न पाहिलेले रूप आम्हाला दाखवल्याबद्दल आभार, अशा मजेशीर कमेंट देखील करत आहेत.
दरम्यान, राहुल द्रविड सध्या बँगलोरमध्ये एनसीएचा प्रमुख आहे. राहुल नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम करत आहे. त्याने ट्रेन केलेले अनेक खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार आहेत.
Never seen this side of Rahul bhai 🤯🤣 pic.twitter.com/4W93p0Gk7m
— Virat Kohli (@imVkohli) April 9, 2021
महत्वाच्या बातम्या –
‘बिग बॉस’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं कौटुंबिक वादातून केला आत्महत्येचा प्रयत्न
तरुणावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला! हलक्या काळजाच्या लोकांनी…
जमीन खोदताना आवाज आला अन् शेतकरी मालामाल झाला; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
कर्माची फळं! मंदिरात चोरी करायला गेला अन् दानपेटीत हात अडकला मग…; पाहा व्हिडीओ
बोंबला! चालू विमानात दारू न मिळाल्यानं ‘या’ मॉडेलने क्रू मेंबरला मारहाण केली अन्…