“रोहितच्या चाहत्यांनो जरा थंड घ्या…”, वादग्रस्त ‘वडापाव’च्या वक्तव्यावर सेहवागचं स्पष्टीकरण

मुंबई | भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला ‘वडापाव रोहित’ अशी उपमा देताना पहायला मिळतो. त्याचबरोबर तो रोहित शर्माच्या फलंदाजीचं कौतूक देखील करतो.

रोहित शर्मा आणि सचिन तेंडूलकर हे दोन्ही खेळाडू वडापावचे चाहते आहेत. तर मुंबई आणि वडापावचं नातं खूप वेगळं आहे. अशातच आता विरेंद्र सेहवागने केलेलं ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे.

बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकातामध्ये मजेशीर सामना रंगला. मुंबई हा सामना जिंकेल असं वाटत असतानाच पॅट कमिन्सने वादळी खेळी करत मुंबईला धुळ चारली. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.

सेहवागने देखील यावर आपल्या नेहमीच्या अंदाजात ट्विट केलं. मात्र, मुंबईच्या फॅन्सला हे ट्विट आवडलं नाही. तोंडातून घास काढून घेतला. सॉरी वडापाव ओढून घेतला. पॅट कमिन्सची ही खेळी ‘क्लिन हिटिंग’च्या सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे, असं सेहवाग म्हणाला.

सेहवागचं वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत राहिलं. मुंबईच्या फॅन्सने यावर नाराजी देखील व्यक्त केली. त्यावर आता खुद्द सेहवागने आणखी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

वडापावचा संदर्भ मुंबईसाठी आहे. एक शहर जे वडापाववर जगतं. रोहितच्या चाहत्यांनी थंड घ्यावं. तुमच्यापेक्षा मी रोहितच्या फलंदाजीचा मोठा प्रशंसक आहे, असं सेहवाग म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘KISS करू नका आणि जोडप्यांनी सोबत झोपू सुद्धा नका’; लाॅकडाऊन लागताच अजब आदेश निघाले

Gold Silver Rate: सोनं-चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या आजचे ताजे दर

“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”

ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…