देश

‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे ‘मेक इन इंडिया’चं बदललेलं नाव- शशी थरुर

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा दिला आहे. मात्र या नाऱ्यावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टीका केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान हे दुसरं तिसरं काहीही नसून मेक इन इंडियाचं नवं नाव आहे, अशी टीका थरुर यांनी केली आहे.

शशी थरुर यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “नए नाम से वही पुराना शेर बेच गए सपनों के वो फिर से ढ़ेरों ढ़ेर बेच गए…” या ओळी लिहित थरुर यांनी एक फोटो ट्विट केला आहे.

या फोटोत मेक इन इंडियाचं चिन्ह असलेला सिंह दिसतो आहे. आत्मनिर्भर भारत, कुछ और भी नया था क्या? असा प्रश्न एक माणूस विचारताना दिसतो आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारत हा नारा दिला. या नाऱ्याचीच शशी थरुर यांनी खिल्ली उडवली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-पायी चालणाऱ्या मजुरांची अर्थमंत्र्यांकडून क्रूर थट्टा- पी. चिदंबरम

-ठप्प असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार चालना; ‘प्लॅनेट मराठी’ने उचललं मोठं पाऊल

-देशभरातील देवस्थानांकडे असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्या- पृथ्वीराज चव्हाण

-स्थलांतरित मजुरांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

-संभाजी राजेंनी सूत्र फिरवली; गड-किल्ले जिवंत ठेवणाऱ्यांना मदत मिळाली