जास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा तत्वावर घरे विकून मोकळे व्हा- नितीन गडकरी

मुंबई | कोरोना विषाणूने देशात हाहाकार मजला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व प्रकारच्या व्यवहारांना याचा चांगलाच फटका बसला आहे. याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना देखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना असलेल्या नरेडकोने आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली. यावेळी बोलताना बोलताना गडकरी यांनी बांधकाम व्यावसायिकांना सल्ला दिला.

मुंबईत लाखो घरे तयार असून विक्रीतून मोठी किंमत मिळण्याची विकासकांना आशा आहे. मात्र हव्या त्या किमतीला घर विकण्याचे दिवस आता गेले असून विकासकांनी जास्त लोभ न ठेवता, ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विकून मोकळे व्हावं, असं गडकरी यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईत प्रति चौरस फूट 30 – 40 हजार रुपये भाव मिळेल या आशेवर अनेक विकासकांकडे लाखो सदनिका आजही विक्री अभावी पडून आहेत. परिणामी कर्जाऊ घेतलेल्या करोडो रुपयांचे बँकांच्या कर्जांचे हप्ते भरत बसण्याची वेळ विकासकांवर आली आहे, असं देखील नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारचा मोठा निर्णय; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी

-‘आम्ही पुन्हा येऊ हा प्रयत्न फसला’; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

-लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…

-जनता हीच राज्य आणि देशाची संपत्ती, ती वाचली पाहिजे- उद्धव ठाकरे

-हो, मी पुरावे बघितलेत, वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाची उत्पत्ती- डोनाल्ड ट्रम्प