आता शिवसेना शाखाप्रमुखांवर थेट ‘मातोश्री’वरुन वाॅच

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता वार्ड तिथे शाखाप्रमुखांच्या नियुक्तीची मोहिम हाती घेतली आहे.

राज्यभरात एक लाखाहून अधिक शाखाप्रमुखांच्या नियुक्तीचे लक्ष्य असून सर्वांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. त्यांना दिलेल्या कार्डवर थेट ‘मातोश्री’वरुन लक्ष ठेवण्यात योणार आहे.

एका वार्डमध्ये एका पुरुषासोबत महिलेची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

शहरी भागाप्रणाणे ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या हद्दीत जेवढे वार्ड असतील तेिथे प्रत्येकी एक पुरुष आणि महिला शाखाप्रमुख असतील. त्यांच्या हाताखाली तीन उपशाखाप्रमुख असतील. 

मुंबईत शिवसेनेच्या आमदारांना जेवढे महत्व आहे तेवढे शाखाप्रमुखांना आहे. पक्षसंघटनेत शाखाप्रमुख हा तळागाळापर्यंत काम करतो.

महत्वाच्या बातम्या- 

-“खटला कुठेही चालू द्या, पाकिस्तानला कूलभूषण यांना न्याय द्यावाच लागेल”

-सत्य आणि न्यायाचाच विजय झाला; कूलभूषण जाधव प्रकरणी मोदींची प्रतिक्रिया

-माझ्या वाढदिवसावर वायफळ खर्च करु नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

-चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेने काढलेला मोर्चा योग्यच!

-मी येतोय… सगळ्यांचे आभार मानायला आणि मनं जिंकायला- आदित्य ठाकरे