बेंगळुरू : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरील कारवाईनंतर आता काँग्रेसचे आणखी एक दिग्गज ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनायलाने समन जारी केले आहेत. शिवकुमार यांना ईडीने शुक्रवारी हजर होण्याच्या सूचना केल्या असून, त्यानुसार शिवकुमार आज ईडीच्या कार्यालयात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पूर्वी गुरुवारी कर्नाटक हायकोर्टाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेत शिवकुमार यांनी ईडीचे समन फेटाळून लावण्याची मागणी केली होती. शिवकुमार यांच्याविरोधात बेहिशेबी संपत्तीबाबतचे प्रकरण सुरू आहे.
गेल्या वर्षी ईडीने शिवकुमार यांच्यासह इतरांवर मनी लाँड्रिंगचे प्रकरण दाखल केले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित कर चोरी आणि हवाला प्रकरणाच्या आधारे त्यांच्याविरोधात काही प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
या पूर्वीही सन 2017 मध्ये आयकर विभागाने शिवकुमार यांच्या 64 ठिकाणांवर छापेमारी केली होती. हे प्रकरण साधे आयकरासंबंधी असल्याचे आपण कोर्टाच्या लक्षात आणून दिल्याचे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. आपण पूर्वीच आयकर परतावा भरलेला आहे. या प्रकरणाशी मनी लाँड्रिंगशी काहीही संबंध नाही. काल रात्री ईडीने मला शुक्रवारी दुपारी 1 वाजता दिल्ली येण्यासाठी समन पाठवले आहेत. मी कायद्याचे पालन करीन, असं शिवकुमार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
…तर शिवराय त्यांना माफ करणार नाहीत- अमोल कोल्हे – https://t.co/MdxSWPHWf5 @kolhe_amol
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
मराठवाड्यात राष्ट्रवादीला धक्का; आमदार राणा जगजीतसिंह पाटील वडिलांसह भाजपच्या वाटेवर! https://t.co/5iuAFxh9qg #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
रानू मंडल यांच्या गाण्याची नक्कल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल https://t.co/6DA6c1o0zl #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019