मुंबई | गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना एसटी कर्मचाऱ्यांच शिष्टमंडळ भेट घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.
गुरूवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. आता पारनेर येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेवून आपलं म्हणणं मांडलं आहे.
यावेळी अण्णा हजारे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जनमत तयार केल्यास सरकार घाबरून तुमच्या मागण्या मान्य करेल, असा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असं देखील आश्वासन अण्णा हजारे यांनी दिलं आहे. दोन आठवड्यांपासून सुरू असलेलं आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरू ठेवा, असा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे.
आंदोलनादरम्यान आपल्याकडून कोणत्याही सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, याची काळजी आंदोलकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं आहे.
आंदोलनकर्ते आणि सरकार वेगवेगळे नाहीत, त्यामुळे दोघांनाही एकमेकाचा विचार करायला हवा, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील सरकारला जाग येत नाही, असं म्हणत अण्णा हजारे यांनी सरकारवर टीका केली आहे.
लाखो लोकांनी एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजे, तरच या सरकारचे तोंड उघडेल आणि आपल्या मागण्या होतील, अशी टिप्पणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
दरम्यान, जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात येणार नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांचे हाल होऊ नये याकरिता संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनीही वारंवार सातत्याने संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.
मात्र, वेळेवर पगार होत नाही, अपुऱ्या सुविधा दिल्या जात आहेत, अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहे. त्यामुळे संप मागे घेण्याच्या मानसिकतेत एसटी कर्मचारी दिसतं नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फुट?; तब्बल 2 हजार कर्मचारी कामावर परतले
राज ठाकरे-शरद पवार बैठकीत काय झालं?; आली ‘ही’ माहिती समोर
“ठाकरे सरकार छत्रपतींची नाही तर पाकिस्तानची औलाद”
‘हिंदुत्व म्हणजे मुस्लीम किंवा…’; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ मुद्द्यावर होणार गंभीर चर्चा