“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”

मुंबई |   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.

याच मुद्यावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपाची खेळी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी लावून धरली आहे.

परमबीर सिंह यांनी जे आ.रोप अनिल देशमुखांवर केले आहेत. त्या आ.रोपाची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या सगळ्या आ.रोपांची चौकशी निवृत्त न्यायमूर्तीमार्फत केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलं.

मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंह यांनी माझ्यावर जे आ.रोप केले आहेत, त्याबद्दल चौकशी लावून दूध का दूध, पानी का पानी करावे, अशी मागणी मी केली असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावून धरली, तर मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. याच मुद्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

अनिल देशमुख यांच्यावर तोंड उघडू नको, म्हणून वरिष्ठाचा दबाव असल्याचा खळबळजनक दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे.

त्यात त्यांनी अनिल देशमुखांकडून 21 तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते 4 दिवस प्रलंबित ठेवून 24 तारखेला प्रसिद्ध केले. 100 कोटींच्या वसुलीचे आ.रोप आणि पत्रात व्हॉट्सअॅप, एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तसेच अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून, वरिष्ठांचा दबाव नाही तर ?, असंही पाटीलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करताना अनिल देशमुखांनी मागणी केलेल्या पत्राची फोटो देखील जोडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सैराट फेम आर्ची म्हणते, सगळेच चिञपट ‘सैराट’…

जाणून घ्या! किवी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

नीतू कपूरचा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ…

सफाई कर्मचारी ते सुुपरस्टार; वाचा ‘या’…

“देवेंद्र फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा आहे…