‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबई | कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरून गेलंय. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. संपूर्ण जग ओमिक्रॉनशी (Omicron-Covid19) झुंज देत आहे.

ओमिक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. या व्हायरसला रोखणं शक्य नाही. जवळपास प्रत्येकाला ओमिक्रॉनची लागण होणार आहे, असं आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी एनडीटीव्हीला या वृत्तवाहिनीला सांगितलं.

कोरोना आता घातक आजार राहिलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही भासत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ओमिक्रॉन हा एक आजार आहे ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचंही कळणार नाही. कदाचित 80 टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्या संसर्ग कधी झाला? त्यामुळे याबाबतची मनातील भीती दूर करून या आजारासोबत जगायला आपण शिकलं पाहिजे, असंही जयप्रकाश मुलियाल यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची लस पुन्हा पुन्हा बुस्टर डोस म्हणून देण्यात काहीही अर्थ नाही. ओमिक्रॉनची लागण सर्वांना होणारच आहे, असंही जयप्रकाश मुलियाल म्हणाले आहेत.

नव्या कोरोनाच्या व्हेरियंटला प्रतिबंध करू शकेल अशा लसची निर्मिती करणं गरजेचं सूअन ती लस दिली जात असेल तर ते अधिक योग्य ठरेल, असंही जयप्रकाश मुलियाल म्हणाले आहेत.

कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांनी बूस्टर डोस देण्याचा सल्ला दिला नाही. बूस्टर डोस देऊन कोणतीही महामारी रोखू शकता येणार नाही हे वास्तव आहे. तसेच प्रिकॉशनरी डोस म्हणून तो सरकारला दिला गेलेला सल्ला असल्याचं जयप्रकाश मुलियाल म्हणालेत.

दरम्यान, आपण सर्व जण जास्तकाळ घरात कोंडून राहु शकत नाही. ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक सौम्य असल्याचंही जयप्रकाश मुलियाल यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही” 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती 

काळजी घ्या…, कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ‘ही’ नवी लक्षणं 

नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण!