परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं

मुंबई | राज्यासह देशात पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा देणारी खळबळजनक वक्तव्य काही महिन्यांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलं होतं. त्यानंतर सर्वत्र विविध चर्चा रंगल्या होत्या.

परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

परमबीर सिंह यांच्यावर देखील राज्यात विविध ठिकाणी खंडणी घेतल्याचे गुन्हे दाखल झाले होते. परिणामी परमबीर सिंह यांना देखील राज्य सरकारनं पदावरून काढून टाकलं होतं.

परमबीर सिंह यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप आहेत. सदरील प्रकरणाचा तपास हा सीआयडी मार्फत होतं आहे. अशात सीआयडीच्या तपासात मोठे खुलासे होत असल्याचं दिसतंय.

परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून प्रसिद्ध असणारा संजय पुनमिया यांनी उद्योगपती श्याम सुंदर अग्रवाल यांना फोन काॅलवर खंडणी मागितल्याचा खुलासा तपासात करण्यात आला आहे.

एका खास साॅफ्टवेअरच्या मदतीनं संजन पुनामियानं छोटा शकीलच्या आवाजात अग्रवाल यांना काॅल केल्याचा खुलासा झाला आहे. यानंतर राज्यात बरीच खळबळ माजली आहे.

श्याम सुंदर अग्रवाल यांना खंडणीसाठी त्रास देण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर सीआयडीनं अधिक वेगानं हा तपास सुरू केला आहे. परमबीर सिंह आणि त्यांच्या साथीदारांची नावं अग्रवाल यांनी घेतली आहेत.

पुनामिया यांनं अग्रवाल यांना फोन केला होता आणि अग्रवाल हे छोटा शकीलच्या जवळचे असल्याचं दाखवण्याचा डाव आखल्याचा खुलासा देखील झाला आहे. हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं असल्यानं सीआयडी प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंंत्री अनिल देशमुख, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या प्रकरणानं सध्या मुंबई पोलीस दलाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…” 

देशात नवीन राष्ट्रपिता तयार होतोय, त्याचं नाव नथुराम गोडसे- तुषार गांधी 

भारतासाठी गुड न्यूज; कोरोनाबाबत ही महत्वाची माहिती समोर 

‘भिकार सीरियल पाहणं बंद करा’; विक्रम गोखले भडकले