“अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं”

नवी दिल्ली | केंद्रिय सामाजिक न्यायविकास मंत्री रामदास आठवले यांनी अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं, अशी मागणी राज्यसभेत केली आहे. संसदेच्या अधिवेशानदरम्यान राज्यसभेत बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांची आठवले यांनी भेट घेतली. त्यांची भेट घेऊन आठवले यांनी ही मागणी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या बोलताना आठवले म्हणाले, पोखरियाल हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना भेटून अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं, अशी मागणी केली.

मध्यप्रदेशमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जसं स्वतंत्र विद्यापीठ आहे त्याच धर्तीवर अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील स्वतंत्र विद्यापीठ असावं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, खासगी विद्यापीठात देखील अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण असावं, अशीही मागणी आठवले यांनी केली आहे. यांच्या या मागणीवर केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री काय पावलं उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-