राज्याच्या राजकारणात खळबळ; सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत

औरंगाबाद | महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्य सरकारसमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सरकारला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री संजय राठोड यांना गैरव्यवहाराच्या आरोपांमुळं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ठाकरे सरकारवर जोरदार टीकाही झाली होती.

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील काही दिवसांपूर्वीच न्यायालयानं खोटी माहिती दिल्याच्या आरोपांवरून शिक्षा सुनावली आहे. अशातच आता राज्याचे मातब्बर मंत्री शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

2019 विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांतर झालं होतं. त्यावेळीच काॅंग्रेस सोडून सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्री करण्यात आलं.

सत्तार यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. परिणामी ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सिल्लोड न्यायालयात अब्दूल सत्तार यांच्याविरोधात फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. संबंधित अर्जावर लवकर पोलीस तपास करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि डाॅ. अभिषेक हरिदास यांनी सत्तार यांच्यावर मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. परिणामी ठाकरे सरकारच्या आणि शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.

सिल्लोड येथील जमीन व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. परिणामी आता सत्तार यांच्यामुळं विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

  राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू