किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांचे नवाब मलिक हे दाऊचे पार्टनर आहे तर उद्धव ठाकरे यांची कसाबशी व्यावासायिक संबधं. मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत आहेत, असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.

यशवंत जाधव हा उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे, त्यांची 1000 कोटी ची जागा असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

नवाब मलिकचे संबंध दाऊदशी आहेत तर ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत आहेत. उद्धव, रश्मी, आदित्य, तेजस आणि त्यांचा मामा हे पार्टनर तरी नेमकं कुणाकुणाचे आहेत?, असा सवाल त्यांनी केला आहे.

हेमंत करकरे यांची हत्या कसाबने केली पण त्यांचं जॅकेट हे बुलेटप्रुफ होतं. मग हे जॅकेट नकली होतं आणि ते दिलं होतं विमल अग्रवाल यांनी असा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कसाबशी कसे संबंध आहेत ते सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मंकीपॉक्सने जगाचं टेंशन वाढवलं, ‘ही’ लक्षणं आढळल्यावर वेळीच व्हा सावध! 

“मी राज ठाकरेंना 2008 पासून शोधतोय, जर ते कधी भेटलेच तर…” 

“6 व्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही” 

“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार

‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले