‘राज्यातील वातावरण बिघडवाल तर…’; वळसे-पाटलांचा गंभीर इशारा

मुंबई | राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे पण वातावरण बिघडणार नाही यासाठी राज्य सरकार काळजी घेत आहे. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. पण कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे राज्यात सामाजिक तणाव, अशांतता निर्माण होत असेल तर, मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो त्याच्याव कारवाई केली जाईल, असा इशारा दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी दिला आहे.

त्यांनी येत्या एक – दोन दिवसांत मार्गदर्शक नियमावली सादर केली जाणार असल्याचं सांगितलं. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं आहे.

आज पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. आम्ही त्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व गुप्तचर यंत्रणांशी बोलून परिस्थिती हाताळण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्याच्या चर्चांवर वळसे पाटलांनी बोट ठेवले आहे.

अलीकडे केंद्र सरकारडून राज्याच्या अधिकारांंना बाजूला सारुन काही दोषींना, व्यक्तींना सुरक्षा पुरवली जात आहे. पण केंद्रसरकारकडून राज्याचे अधिकार डावलून दोषींना, व्यक्तींना सुरक्षा हे हे राज्याच्या अधिकावर अतिक्रमण आहे, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेना आमदाराच्या पत्नीच्या आमहत्येचं गूढ वाढलं, त्या शेवटच्या मेसेजने खळबळ

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी