मुंबई | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये नुकताच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथेनंतर केलेल्या शिवरायांच्या जयघोषावरून चांगलाच गदारोळ उडाला होता. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याच पार्श्वभूमीवर आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी शपथविधीसाठी नियमावली ठरवुन देण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे. त्याबरोबरच शपथविधी घेताना आपल्या आराध्य व्यक्तींची नाव जोडून शपथ घेण्याला अटकाव बसावा यासाठी कोश्यारी यांनी हे पाऊल उचलले आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यालयाने याबाबत ट्विटर वरून माहिती दिली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे, ” शपथ ग्रहण प्रक्रिये संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र पत्र लिहून केली आहे.”
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीवेळी अशाचप्रकारे घोषणा देण्यावरून वाद झाला होता. यावेळी के.सी.पाडवी यांना तर राज्यपालांनी पुन्हा शपथ घ्यायला लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर नाराजी व्यक्त केली होती.
शपथ ग्रहण प्रक्रिये संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेकडे स्वतंत्र पत्र पाठवून केली आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 25, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनानं त्यांचं आयुष्यच बदललं!; देहव्यापार सोडून सुरु केलं ‘हे’ काम
आता मुख्यमंत्र्यांनाच झाली कोरोनाची लागण; म्हणाले, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्या!
कोरोनाचे भयानक वास्तव! नोकरी सुटल्याने बापाने पोटच्या मुलाला विकलं!
“कोरोना झालेल्या रुग्णांना पुण्यात कोणी बेड देतं का बेड?”
…म्हणून अमिताभ बच्चन यांनी जोडले हात; म्हणाले, “देवा माझी मदत कर!”