लग्नानंतर सात महिन्याने वरूण धवनने केला मोठा खुलासा, म्हणाला…

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता वरुण धवन. वरुण धवन नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

अभिनेता वरुण धवन हा सात महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकला आहे. वरूणने नताशा दलाल हिच्याशी लग्न केलं आहे. नताशा वरुणची बालमैत्रिण आहे. हे दोघे बरेच वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

कित्येक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 24 जानेवारी रोजी एकमेकांसोबत सात फेरे घेतले. या दोघांनी अलिबागमध्ये लग्न केलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. आपण हे लग्न मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत का केलं? याबद्दल आता वरूणने खुलासा केला आहे.

वरूणने ज्यावेळी लग्न केलं त्यावेळी देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त होता. देशात कोरोना खूप वेगानं वाढत होता. या काळात वरुण आणि त्याचे कुटुंब देखील प्रचंड काळजी घेत होतं. याच कारणाने वरुणने अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं.

याबद्दल एका मुलाखतीत बोलताना वरूण धवन म्हणाला की, महामारीच्या काळात सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. जे काही आहे त्याचा आदर केला पाहिजे. तसेच मला देखील माझं लग्न खुप मोठं करायचं नव्हतं.

माझ्या कुटुंबात अनेक वयस्कर मंडळी आहेत. त्यांची सुरक्षितता हे माझ्यासाठी महत्वाचं होतं. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मी कमी माणसांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडण्याचे ठरवले, असं वरूणने म्हटलं आहे.

दरम्यान, वरूण धवनच्या लग्नाला केवळ 50 लोक उपस्थित होते. लग्नापूर्वीचे अनेक कार्यक्रम जोरात पार पडले. मात्र, लग्नाला केवळ मोजकेच लोक उपस्थित होते. वरुणने सोशल मीडियावर अचानक आपल्या लग्नाचे फोटो अपलोड करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

महत्वाच्या बातम्या –

ऐकावं ते नवलंच! मोबाईलच्या नादात भररस्त्यात आई बाळाला विसरली अन्…; पाहा व्हिडीओ

‘चुक केली पण…’, शिल्पाच्या पोस्टनं वेधलं अनेकांचं लक्ष

अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!

…म्हणून सई ताम्हणकर मराठी चित्रपटांपासून दुरावली!

पवनदीपच्या खासगी गोष्टीचा अरुणीताकडून खुलासा, म्हणाली…