गंभीर आरोप असलेल्या ‘या’ नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊनही गेला महिनाभर त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. आज त्यांना अखेर मुहूर्त मिळालाय. यावेळी शिंदे गटाचे नऊ आणि भाजपचे नऊ अशा अठरा आमदारांनी शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने यावेळी शपथ घेतलेल्या अठरा पैकी सतरा मंत्र्यांवर आरोप केले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील सतरा मंत्र्यांवर विविध स्वरुपाचे आरोप, गुन्हे आणि घोटाळे दाखल आहेत. याचा पाढा राष्ट्रवादीने वाचला आहे.

मंत्रिमंडळाच्या शपथविधीला पहिली शपथ राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी भाजपला गँग्स ऑफ वासेपूर म्हटले होते. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. आता ते भाजपचे मंत्री आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांच्यावर साडे बाराशे कोटी रुपयांचा आरोप आहे. विधीमंडळात त्यांनी LGBTQ समाजाच्या भावना देखील दुखावल्या होत्या. गिरीश महाजन यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील शॉपिंग कॉम्पलेक्स 200 कोटी घोटाळ्याचा आरोप आहे.

शिंदे यांच्या सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर पाच गुन्हे नोंद आहेत. तसेच खंडणी आणि फसवणुकीचे देखील त्यांच्यावर आरोप आहेत. डॉ. विजयरकुमार गावित यांच्यावर आदिवासी विकास कामात कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

मिरजेला दंगल नवीन नाही. अशी प्रक्षोभक भाषा वापरुन सामाजिक अशांतता निर्माण करणारे सुरेश खाडे हे देखील शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत. तसेच माझ्या मतदार संघातील रस्त हेमामालिनीच्या गालासारखे आहेत, असे म्हणारे गुलाबराव पाटील देखील या मंत्रिमंडळात आहेत.

संदीपान भुमरे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी भिकारी बनणार नाही, असे बोलणारे तानाजी सावंत आणि वरिष्ठ नेत्याचे गुणगाण गाण्याच्या नादात दलितांच्या भावना दुखावणारे रविंद्र चव्हाण हे देखील शिंदे सरकारात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हंटले आहे.

नुकतीच टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आली आहेत. तसेच अतुल सावे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करत एका तरुणाने आंदोलन केले होते.

संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे आरोप होते. त्यांना सत्तेत येण्याअगोदर क्लिन चीट मिळाली होती. उदय सामंत यांची पदवी बनावट असल्याचे बोलले जाते.

तसेच एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांच्यावर विनयभंग झालेल्या महिलेने थट्टा केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. शंभूराज देसाई हे महाविकास आघाडीसोबत असताना, किरीट सोमय्यांकडे किती लक्ष द्यायचे, हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे म्हणाले होते.

या सर्व आमदार आणि मंत्र्यावर विविध आरोप आणि घोटाळे नोंद असून ते आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत, असे आरोप राष्ट्रवादीने केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

वादग्रस्त आणि आरोप झालेले ‘हे’ मंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळात

‘हे अत्यंत दुर्देवी’, संजय राठोडांना मंत्रिपद मिळताच चित्रा वाघ संतापल्या

शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांनाही सर्वोच्च न्यायालयाचा दणका

एकीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तर दुसरीकडे विनायक राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन