प्रियांका गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांना अटक आणि सुटका

नवी दिल्ली | केंद्र सरकारने नव्याने संमत केलेल्या कृषी कायद्यामुळे देशातील वातावरण चांगलंच चिघळलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक शेतकरी या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये ठिय्या मांडून आहेत. कॉंग्रेससह देशातील अनेक बडे पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने उभे ठाकले आहे.

काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते.

ताब्यात घेण्यात आलेल्या कॉंग्रेस नेत्यांमध्ये प्रियांका गांधी यांच्यासह के. सी. वेणुगोपाल, अजय माकन, के. सुरेश, कुमार शैलजा, रणदीप सिंग सुरजेवाला, एच. के. पाटील, पवन कुमार बन्सल, विवेक बन्सल, भक्त चरण दास, देवेंदर यादव, मनीष चत्रथ, दीपेंदर सिंग हुडा, कुलदीप बिष्णोई, सुनील जाखड, गोविंद सिंग दोतासरा, सयद नासीर हुसैन, प्रदीप तमटा, सुष्मिता देव, आनंद शर्मा, , जयराम रमेश, राजीव सातव, कुलजीत नाग्रा, डॉ. चेला कुमार आणि इतर काही नेत्यांचा समावेश होता. ताब्यात घेतल्यानंतर काही वेळानं या सर्वांची सुटका करण्यात आली होती.

केंद्र सरकार जोपर्यंत नव्याने संमत केलेली कृषी विधेयकं मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलनातील एकही शेतकरी मागे हटणार नसल्याचा ईशारा काल राहुल गांधी यांनी दिला आहे. काल राष्ट्रपतींना निवेदन सोपवल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान टीका ऐकण्यासाठी केव्हाच तयार नसतात. जो कोणी त्यांच्या विरोधात उभा होता त्यांना लगेच अतिरेकी ठरवले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी जरी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न केला तर मोदी त्यांनाही अतिरेकी ठरवतील.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशातील अनेक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेले हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचं शेतकऱ्यांच म्हणनं आहे. याच कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठिय्या मांडून आहेत.

जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. गरज पडल्यास आपण सहा महिने इथेच राहू असं देखील आंदोलनातील शेतकरी सांगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

राजधानीत राडा! शेतकऱ्यांना पाठींबा दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी फोडलं आपच्या आमदाराचं ऑफिस; पाहा व्हिडिओ

‘KBC’तील एक कोटी फक्त नावालाच, वाचा करोडपती होणाऱ्या स्पर्धकाला किती रुपये मिळतात?

सोन्याची झळाळी पुन्हा उतरली, वाचा आजचा सोन्याचा भाव

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीवरंच कारखान्यातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

अबब! ‘या’ शहरात सापडला तब्बल 99 हजार किलो सोन्याचा खजिना, किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल