देश

‘सेक्स बॉम्ब’मुळे विमानतळावर उडाली एकच धावपळ; अन् निघालं…

सेक्स बॉम्ब हा शब्द ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? मात्र हे खरं आहे. जर्मनीच्या बर्लीन शहरातील स्नोफेल्ड विमानतळ यासंदर्भात खळबळजनक आणि तितकाच विनोदी प्रकार घडला.

काही दिवसापूर्वी या विमानतळावर सुरक्षा यंत्रणांना एका प्रवाशाच्या बॅगमध्य़े व्हायब्रेटर्स आणि सेक्स टॉइज आढळले. हे बॉम्ब असल्याची शंका आल्याने त्यांनी हायअलर्ट जारी केला. या गोंधळामुळे काही काळासाठी हे विमानतळ बंद करण्यात आले. 

ज्या टर्मिन्स डी मध्ये हा प्रकार घडला तो पोलिसांनी तात्काळ रिकामा केला. त्यानंतर विमानतळावरील उद्घोषणा कक्षामधून संबंधित बॅगच्या मालकाला बॅगेतील वस्तू काय आहे? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावणं धाडण्यात आलं.

धक्कादायक बाब म्हणजे या माणसाने या वस्तूबद्दल जास्त स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ केली. सुरक्षा यंत्रणांचा संशय बळावल्याने त्यांनी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण केलं. 

बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॅगेची तपासणी केली. त्यांना बॅगेत काहीच आक्षेपार्ह आढळलं नाही. अधिक तपास केला असता ती सेक्स टॉईज असल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आलं. त्यानंतर संबंधित प्रवाशाला समज देऊन सोडण्यात आलं, मात्र प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. 

IMPIMP