सेक्सनंतर डोकं दुखत असेल तर गांभिर्याने घ्या, जीवावरही बेतू शकतं

नवी दिल्ली | वैज्ञानिक दृष्टीकोनातून सेक्स (SEX) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेकदा सेक्स टाळण्यासाठी महिला डोकेदुखी असल्याचं कारण देताना दिसतात. त्यावर अनेकदा विनोद देखील केले जातात.

मात्र, सेक्स करताना डोकं दुखणं म्हणजे विनोदाचा विषय नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. लोयोला युनिव्हर्सिटी शिकागो स्ट्रिच स्कूल ऑफ मेडिसिन मधील जोस बिलर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

अनेकदा सेक्स करत असताना काही लोकांना डोकेदुखी जाणवते. हे लोक डॉक्टरांशी याबद्दल बोलण्यास संकोच करतात आणि डॉक्टरांनी याबद्दल विचारलं असताना मोकळेपणाने उत्तर देत नाहीत.

सेक्स संबंधित डोकेदुखी सौम्य ते गंभीर स्वरूपाची असू शकते. हे अत्यंत वेदनादायक आणि भितीदायक देखील असू शकते, असं बिलर यांनी सांगितलं आहे. या गोष्टी हलक्यात घेऊ नका, असंही ते म्हणाले आहेत.

अशा प्रकारची व्यक्ती स्वत: नैराश्यात जाते आणि स्वत:च्या पार्टनरला देखील निराश करते. फक्त महिलाच नाही तर पुरूषांमध्ये देखील अशा प्रकारची लक्षण आढळतात.

अशा प्रकारची प्रकरणे दुर्मिळ आहेत, परंतु ही डोकेदुखी ब्रेन हॅमरेज, स्ट्रोक, ग्रीवाच्या र्टरी डिसेक्शन किंवा सबड्युरल हेमेटोमामुळे देखील असू शकते. ते जीवावरही बेतू शकतं, असं बिलर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना सेक्स संबंधित डोकेदुखीची शक्यता 3 ते 4 पट जास्त असते. त्याच्या आधारावर औषधे घेतली जाऊ शकतात, असंही बिलर यांनी सांगितलं आहे.

याशिवाय डॉक्टर दररोज व्यायाम करण्याची आणि निरोगी वजन राखण्याचा देखील सल्ला देतात. त्याचबरोबर दारू आणि सिगारेट कमी केल्यास याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”

 …तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

  धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल

  5 वर्षाखालील मुलांनी मास्क लावावं की नाही?; केंद्र सरकारनं जारी केले नवे नियम