मुंबई | लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. लतादीदींच्या अत्यसंस्कारासाठी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान देखील उपस्थित होता.
तेंडुलकरनंतर शाहरूख खानही लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढे आला. त्यावेळी शाहरूख खान याने लतादीदींना श्रद्धांजली वाहत असताना दुआ मागितली.
शाहरुख खाननं दुवा मागितल्यानंतर मास्क खाली करुन केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार होता, असा आरोप अनेकांनी ट्वीट करत केला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय.
अनेकांनी ट्वीटरवर पोस्ट करत शाहरुख खाननं मास्क खाली करुन लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी तो थुंकला असा दावा केला आहे. काहींच्या मते शाहरुख खानं असं करुन लता मंगेशकर यांचा अपमान केला असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय. पण खरंच शाहरुख खाननं असं केलंय? तो खरंच थु्ंकलाय का? नेमकं यावेळी काय झालं आहे, ते ही जाणून घ्यायल हवंच.
अगदीच थेट सांगायचं, तर शाहरुख खान हा थुंकलेला नाही. थुंकना आणि फुंकना यात जमीन अस्मानाचा फरक असतो, हे वेगळं सांगायचा नकोच. पण दोन्ही गोष्टी करताना आपल्या ओठांची होत असलेली रचना सारखी असल्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला. पण ही गोष्ट अनेकांनी समजून घेण्याच्या आधीच शाहरुख खानवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Work From Home बाबत केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
ह्युंदाईला पाकिस्तानचा पुळका, भारतीयांनी ‘असा’ उठवला बाजार!
नितेश राणे यांना मोठा झटका; कोठडीत मुक्काम वाढला
लतादिदी अनंतात विलीन; अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदीसह अनेकांची हजेरी
“मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाहीये”