शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय ‘या’ आलिशान घरात, पाहा फोटो

मुंबई| बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची दोन्ही मुले नेहमीच चर्चेत असतात. शाहरुख खानची लेक सुहाना सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सुहानाची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

सुहानाचे चाहतेही तिच्या लाइफ स्टाइलबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. सध्या सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. सुहानाने न्यूयॉर्कमधील घराचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ते फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

नुकतेच सुहानाने आपल्या न्यूयॉर्कमधील आलिशान घराचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुहाना खानने गेल्यावर्षीच इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं आहे. यामुळे तिचे चाहता वर्ग अजून वाढला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहानाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिच्या घराची एक झलक नेटकऱ्यांना दाखवली आहे. सोबतच तिने तिच्या मैत्रिणीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती मैत्रिणीसोबत बाल्कनीमध्ये उभी आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती घरातील ग्लास वॉल जवळ उभी राहून फोटोसाठी पोज देत आहे. तिच्या या फोटोंवरून तिचं घर किती आलिशान आहे याचा अंदाज नेटकऱ्यांना येतो.

न्यूयॉर्कमधील सुहानाच्या घरात मोठी लायब्ररी देखील आहे.सर्व फोटोपाहून सुहाना राहत असलेले किंग खानचे घर हे अतिशय सुंदर असल्याचे दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहानाच्या घराचे फोटो जरी चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरले असले तरीही तिच्या फोटोमुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं आहे.

सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यास करत आहे. सुहानाला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये काम करण्याची आवड आहे. इतकेच नाही तर, तिने अनेक मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहेत. सुहानाची जिवलग मैत्रीण असणाऱ्या अभिनेत्री अनन्या पांडेनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

एका मुलाखती दरम्यान, अनन्या सुहानाबद्दल बोलताना म्हणाली की, सुहाना सुरुवातीपासूनच अत्यंत हुशार आहे आणि अभ्यास संपल्यानंतर ती नक्कीच अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

महत्वाच्या बातम्या – 

‘तुला बाॅयफ्रेंड आहे का?’ असं विचारणाऱ्या…

अभिनेत्री वैदेही परशुरामीनं खरेदी केली ‘ही’ नवी…

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्रीनं घेतली कचरापेटीत…

ज्या ड्रेसमुळे ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा ट्रोल…

मौनी रॉयच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा