“आम्हाला कुणी विचारत नाही, घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय”

पंढरपूर | शिवसेना आमदार (Shivsena Mla) शहाजी बापू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.

मी पहिल्यांदाच शिवसेनेचा आमदार म्हणूननिवडून आलो. त्यामुळे मला पहिल्यांदाच लांब राह्याला सांगितलं होतं. त्यामुळे मला वाटत नाही या सरकामध्ये आमचं कोणी एकेल. आमचा कोण विचार करेल असंही आता वाटत नाही असं म्हणत पाटील यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे.

हॉस्पिटलचे काम चांगलं झालं आहे. माढा मतदारसंघातून आपला एकही मंत्री नाही. माझं सोडं, मी पहिल्यांदाच आमदार झालो आहे. पण शिवसेनेतल्या कुणालाही घेतलं नाही. बबनदादा सारखे 30 वर्ष निवडून आले त्यांनाही संधी नाही. त्यामुळे आम्हाला कुणी काय विचारेल माहिती नाही, असंही ते म्हणालेत.

घर की कोंबडी दाळ बरा बर होऊन बसलंय, आमचा कुणी विचार करायला तयार नाही, गप्प बसा जा गावाकडे, असं म्हणत पाटील यांनी आपली मनातली खदखद बोलून दाखवली आहे.

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहे. राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार पाटील यांनी देखील आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली.

पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

“सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेलाय, राज्यात सगळा सत्यानाश सुरुय” 

‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 50 लाख 

राज्यातील दारूची दुकानं बंद होणार?; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

सिंधुताईंच्या ‘त्या’ इच्छेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; घेतला मोठा निर्णय

पालकांनो मुलांची काळजी घ्या! कोरोनाबाधीत मुलांना ‘या’ आजाराचा अधिक धोका