“पवारसाहेब जागतिक नेते, मोठे नेते मग पवारांकडच जा, इथं कशाला अडकून पडलाय”

मुंबई | काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेच, असं म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांचा हा डायलॉग काही दिवसातच महाराष्ट्रभर व्हायरल झाला. आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी बुधवारी ‘एबीपी माझ्या’च्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील त्यांनी यावेळी सडकून टीका केली.

रोज सकाळी पवापसाहेब जागतिक नेते, मोठे नेते मग पवारांकडच जा, इथं कशाला अडकून पडलाय, अशा शब्दांत आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.

हा एक राजकारणाचा भाग आहे. आम्ही गेल्यानंतर माघारी येणार नाही, हे समजल्यानंतर आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. सुडाचं राजकारण सुरु झालं. यांना पैसे मिळाले, घबाड मिळाले, असे आरोप करण्यात आले.  1974 पासून आतापर्यंत राजकारणात इतक्या खालच्या दर्जाची भाषा कधीच आली नव्हती, असंही ते म्हणालेत.

मला सभागृहातच बोलायचं होतं. पण संधी मिळाली नाही. आता इथं सांगतो. फूटबॉलपटू मॅराडोना यांनी ज्यावेळी फूटबॉल खेळायचं सोडलं तेव्हा जागतिक स्पर्धा झाली होती. त्यामधील मॅराडोना याने केलेला गोल, आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे. त्याने कसा गोल केला हे कुणालाच नाही समजले. मॅराडोना गेला कसा, आला कसा अन् वळला कसा अन् गोल केला कसा? हे कुणालाच नाही कळलं. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणातील मॅराडोना आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, सत्तेत असूनही शिवसेनाला निधी पुरेसा दिला जात नव्हता.. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहजासहजी निधी मिळत होता. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मी उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट सांगितली, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आत्ता तरी माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये” 

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 6 वर्षीय चिमुकल्याचा आईच्या डोळ्यादेखत मृत्यू 

‘त्या रात्री उद्धव ठाकरेंनी…’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा 

शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचू न देणाऱ्या कोंडाळ्याचा शहाजी बापू पाटलांनी केला खुलासा, म्हणाले…