Top news महाराष्ट्र मुंबई

‘अजित पवारांच्या बुटाला हात लावला तरी…’, बंडखोर आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

ajit pawar 2

मुंबई | महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा आज पाचवा दिवस आहे. 20 जूनच्या रात्रीपासून सुरु झालेला संघर्ष अद्याप सुरु आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदार अगोदर गुजरातमधील सूरतमध्ये गेले. पुढे शिंदे समर्थक आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलंय.

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांपैकी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा आणि त्यांचा कार्यकर्ता रफीक शेख यांच्यामधील फोनवरील संभाषण झालं ते आता व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्रं सोडलं आहे.

पक्ष सोडल्यामुळे अजित पवार यांचा आपल्यावरील राग अजून गेला नाही. अजित पवार सुडानेच पेटलेले असतात. त्यांच्या पाया पडलो. बुटाला हात लावला तरी त्यांची अढी काही जात नाही, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

बापू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोंडभरून स्तुती केली. एकनाथ शिंदे आपल्याकडे मुलाच्या नजरेतून पाहतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, आता सांगोला तालुक्याचा विकास होईल, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आक्षेप घेतले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल्यास आपण संपून जाऊ, पुढील निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय! गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट

‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

“बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही योग्य तो पाहुणचार करू”