खेळ

विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली | पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला आहे. नुकतंच त्यानं पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्यावर गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी जोरदार टीका केली.

आफ्रिदीनं पुन्हा एकदा भारताला अप्रत्यक्ष टोला लगावला. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या नावाचा उल्लेख न करता आफ्रिदीनं भारतीयांना खोचक सवाल केला आहे.

यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? एक भाऊ विमानानं इथे आला आणि आम्ही त्याला चहा दिला व सन्मानानं घरी पाठवले. त्यांनी त्याला हिरो बनवलं. अजून आम्ही काय करायला हवं?, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे.

युवी आणि भज्जीनं पाकिस्तानी खेळाडूशी मैत्री तोडली. गेल्या काही दिवसांपासून आफ्रिदीची वक्तव्य पाहता तो राजकारणात जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यात त्यानं आणखी एक वक्तव्य करून भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

महत्वाच्या बातम्या-

-“नारायण राणे शिवसेनेमुळे मोठे झाले अणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले”

-माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…

-भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

-महाविकास आघाडी सरकार सध्या स्थिर आहे पण….- सुधीर मुनगंटीवार