“शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करु शकणार नाही”

पुणे | गेल्या एका महिन्यापासून राज्यासह देशात मुंबईतील एनसीबीची कारवाई प्रचंड गाजत आहे. एका क्रुझवर छापेमारी करत एनसीबीनं ड्रग्ज पार्टीचा खुलासा केला होता.

आर्यन खान प्रकरणाला सध्या वेगळंच राजकीय वळण लागलं आहे. परिणामी या प्रकरणावर सध्या विविध क्षेत्रातील मान्यवर भाष्य करताना दिसत आहेत.

आर्यन खान प्रकरणावरून ज्येष्ठ सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेता शाहरूख खान आणि आर्यन खान या दोघांवरही जोरदार टीका केली आहे.

देशाच्या बॉर्डरवर 21 वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करु शकणार नाही, असे गोखले म्हणाले.

गोखले यांच्या या वक्तव्यानंतर सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. गोखले यांनी आर्यन खान प्रकरणावरून राजकीय भाष्य करण्याचं टाळलं आहे.

आर्यन खान प्रकरणात आर्यनला दोषी मानण्याऐवजी हीरो बनवण्यात आल्यावरून गोखले यांनी प्रचंड नाराजी दर्शवली आहे. परिणामी त्यांच्या या वक्तव्यानं खळबळ माजली आहे.

2 ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या कारवाईत आर्यन खानला पकडण्यात आलं होतं. यावरून सिनेजगतात आर्यन खानचं समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडले आहेत.

विक्रम गोखले आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. आर्यन खान प्रकरणावर गोखले यांचं वक्तव्य हे त्यांच्या त्याच बेधडकपणाचं लक्षण आहे.

आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. आर्यन खान प्रकरणावरून राज्यात बराच गोंधळ झाला होता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात वैयक्तीक वाद रंगला होता.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणावर गोखले यांनी अशाप्रकारे वक्तव्य केल्यानं सध्या गोखले यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

“कंगणा जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचं”

“खरंच हिंदू खतरे में है तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा” 

“…तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का?” 

“गाईचं शेण अन् गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते आणि …” 

मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना आलेल्या निनावी फोनमुळे खळबळ, दिली ही धमकी