शाहरुख खानचा मुलगा आर्यनला क्रूझ प्रकरणात अटक झाल्यानंतर खान परिवार चांगलाच चिंताग्रस्त झाला होता. मात्र शुक्रवारी आर्यनला जामीन मिळाला आणि शनिवारी त्याला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून बाहेर सोडण्यात आलं.
आर्यनची सुटका झाल्यानंतर आता खान परिवारात आनंदाचं वातावरण असल्याचं दिसत आहे. मुंबईतील शाहरुखचा परिवार तर आनंदी आहेच मात्र त्याची न्यूयॉर्कमध्ये शिकायला असलेली मुलगी सुहाना देखील खूश असल्याचं दिसत आहे.
सुहानाने एक अशी गोष्ट केली आहे ज्याची आता फिल्म इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा रंगली आहे. सुहानाने चक्क आपल्या मित्रांसोबत पार्टी केली आहे. तिच्या या पार्टीचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
या पार्टीत सुहाना फुल्ल ऑन मस्तीत असल्याचं दिसत आहे. तीचे अनेक मित्र तसेच मैत्रिणी देखील तिच्यासोबत या फोटोंमध्ये दिसत आहेत. सुहानासोबत त्यांची चांगलीच मस्ती सुरु असल्याचं या फोटोंमधून दिसतंय.
सुहानाच्या पार्टीचं निमित्त काय?
३१ ऑक्टोबर या दिवशी न्यूयॉर्कमध्ये होलोवीन महोत्सव साजरा केला जातो. अशात शनिवारी रात्री सुहाना आणि तीचे मित्र भुतिया ड्रेस घालून पार्टी करायला पोहोचलेले दिसले. सुहानाची मैत्रिण प्रियांकाने या पार्टीचे फोटो पोस्ट केले आहेत.
फोटो- सुहानाची मैत्रिण प्रियांका आऊटफीट दाखवताना
फोटोंमध्ये प्रियांका आपला आऊटफीट दाखवताना दिसत आहे. आणखी एका फोटोत तिच्यासोबत सुहाना दिसत आहे. सुहानाला जोरात मिठी मारल्याचं या फोटो दिसतंय. ती खूश असल्याचंही या फोटोतून दिसतंय.
फोटो- मैत्रिणी आणि सुहाना पार्टीत मज्जा करताना
सुहानाने या पार्टीत आसमानी रंगाचा ड्रेस घातला आहे. याशिवाय तीने चांगली हेअरस्टाईल देखील केल्याचं दिसत आहे. तिचा मेकअप देखील पाहण्यासारखा आहे. आपल्या या अंदाजामुळे ती खूपच सुंदर दिसत असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
फोटो- सुहानाची मैत्रिण प्रियांका पार्टीत मज्जा करताना
सुहानाच्या या पार्टीचे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तीच्या मैत्रिणीने टाकलेल्या या फोटोंवर सुहानाने देखील कमेंट केली आहे. तीने I Love You असं म्हटलं आहे.
ही बातमी वाचली का?- …तर आर्यन खानला पुन्हा होऊ शकते अटक; मोठी माहिती आली समोर
महत्वाच्या बातम्या-
“नेत्यांना आता तोंड लपवून पळावं लागणार”; मोठा गौप्यस्फोट करण्याची घोषणा
“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा वाढ, वाचा आजचा दर
कुत्र्याचा अनोखा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल
आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी
“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया