शाहू राजांचा फडणवीसांकडून कार्यकर्ता म्हणून उल्लेख; ट्रोल झाल्यावर पोस्ट केली डिलीट

मुंबई |  आज राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतीदिन असल्याने विविध क्षेत्रातली मंडळी त्यांचं स्मरण करत आहेत. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शाहू राजांना आदरांजली वाहणारी पोस्ट केली परंतू ती पोस्ट त्यांना काहीच वेळात डिलीट करावी लागली.

देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोस्टमध्ये शाहूराजांना कार्यकर्ते म्हणून संबोधलं होतं. त्यांनी पोस्ट केल्याबरोबर लोकांच्या ही बाब लक्षात आली आणि फडणवीसांना ट्रोल करणं लोकांनी सुरू केलं.

थोर समाजिक कार्यकर्ते, वंचितांच्या शिक्षण आणि हक्कांचे पुरस्कार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. तास ते दीड तास पोस्ट ठेवल्यानंतर आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्यानंतर त्यांनी संबंधित पोस्ट डिलीट केली. अन् शाहूराजांच्या कार्याचा आढावा घेणारा नवीन व्हीडिओ पोस्ट केला.

दरम्यान, शाहू राजांना कार्यकर्ता म्हटल्याने लोकांनी एकच संताप व्यक्त केला. कॉमेंटसच्या माध्यमातून त्यांनी आपला रोष व्यक्त केला. मात्र चूक लक्षात येताच फडणवीसांनी पोस्ट डिलीट करून नवीन व्हीडिओ पोस्ट केला.

 

fadanvis post

 

महत्वाच्या बातम्या-

-….तरच दारूविक्री सुरू ठेवावी- पृथ्वीराज चव्हाण

-कोरोनाने देशातला विक्रम मोडला; आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण तसंच मृत्यूंची नोंद…!

-पुण्यातील ‘गोल्ड’मॅन कायमच हरले आयुष्याची लढाई

-कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला एकही सुट्टी नको म्हणणाऱ्या 2 पोलिसांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप!

-“लॉकडाऊनचा निर्णय नोटबंदीसारखा न घेता देशाला वेळ द्यायला हवा होता”