मुंबई | नाशिकमध्ये आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्या संमेलनामध्ये जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर संमेलन परिसरात शाईफेक केली आहे. संमेलनाच् ही घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांकडून शाई फेक करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या पुस्तकावरून वाद असल्याचं संभाजी ब्रिग्रेडकडून सांगण्यात आलं आहे. समंलेन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं ‘Renaissance State’ या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे. आणि याच पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा ठपका ठेवत संभाजी ब्रिगेडने हे कृत्य केलं आहे.
अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी देखील या अगोदर करण्यात आली होती.
गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनेसान्स – दी अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकातील काही भागावर आक्षेप असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडकडून घेण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे.
गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण केलं असल्याचा दावा करण्यात येत आहे. संभाजी महाराजांनी आईची हत्या केली, महादजी शिंदेंची बदनामी केली, असा संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला आहे.
यासंदर्भात छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील पत्र लिहून लेखक कुबेर यांचा जाहीर निषेध याआधी नोंदवला होता. या पुस्तकावर कायमची बंदी आणावी अशी मागणी वारंवार विविध संघटनांनकडून करण्यात येत आहे.
या पुस्तकाचे प्रकाशक HarperCollins Publishers यांना देखील या पुस्तकाच्या प्रती बाजारातून मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र HarperCollins Publishers प्रकाशन संस्था ही आंतरराष्ट्रीय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी आणायची असल्यास त्याबाबत काही मर्यादा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! Omicron चा धसका; ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
Corona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर
सावधान! ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका
“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”
‘या’ चिल्लर शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 66 लाख