बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; शक्तिकांत दास यांनी केली ‘ही’ घोषणा

नवी दिल्ली | बँक ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आरबीआयचे(RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी एक महत्त्वाची घोषणा (Announcement) केली आहे. इएमआय जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे.

मुद्रा धोरणाची समिक्षा करण्यासाठी प्रत्येक महिन्याला आरबीआयची एक बैठक होते. ही बैठक आज झाली. या बैठकीत देशाची अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याचं शक्तिकांत दास यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी रेपो रेटबाबत देखील माहिती दिली आहे.

रेपो रेट 4 टक्क्यावर, रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. MPC ने आपला अकोमोडिटिव्ह कायम ठेवला आहे. गेल्या वर्षी (2020मध्ये), मार्चमध्ये RBI ने रेपो रेटमध्ये 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. या कपातीनंतर रेपो रेट 4 टक्क्याने खाली गेला होता.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2021-22साठी जीडीपीचा अंदाजित दर 9.5 टक्के कायम ठेवला आहे. अर्थव्यवस्था आणि रिकव्हरीला मजबूत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक दरात वाढ किंवा कपात करण्याचा निर्णय घेईल, असं अनेक जाणकारांचं मत होतं. मात्र, तसं झालं नाही.

शक्तिकांत दास यांच्या मते कृषी सेक्टरच्या मदतीमुळे ग्रामीण भागातील मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृषी सेक्टरलाही मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

अर्थतज्ज्ञ आणि मार्केटच्या तज्ज्ञांच्या मते आरबीआय पुढच्या बैठकीपर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू शकते. नाइट फ्रँक इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनी या बैठकीत रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवेल असा अंदाज वर्तवला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! यूपीएत जाण्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

“शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही” 

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ 

Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड 

“Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”