पुणे | नागराज मंजुळे निर्मित यांचा ‘फँड्री’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता, या चित्रपटाला काही पुरस्कार सुद्धा मिळाले होते. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने शालूची भुमिका साखारली होती. हा चित्रपट जातीवर आधारीत असून त्यांच्यातील प्रेम कहाणी यात दाखवण्यात आली आहे.
‘फॅंड्री’ चित्रपटाचे शूटींग अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात झाले होते. नागराज मंजुळे यांना शालू साठी पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. परंतु काही दिवसानंतर त्यांना पुण्यात राजेश्वरी खरात दिसली. त्यांनी शालूची भूमिकेसाठी राजेश्वरी खरात हिची निवड केली. राजेश्वरी खरात हिच्या घरचा पत्ता शोधून त्यांनी आई वडिलांशी बोलून तिच्याशी शालूच्या भूमिकेसाठी विचारणा केली. आणि तिच्या आई वडीलांनी होकार दिला.
जेव्हा राजेश्वरी खरात हिने फँड्री या चित्रपटाचे काम चालू केलं, तेव्हा ती नववीत होती. तिने आपले शिक्षण जोग युनिव्हर्सिटी पुणे येतून पूर्ण केले आहे आणि सिंहगड कॉलेज मधून तिने B. COM केलं आहे. फँड्री या चित्रपटात विषेश म्हणजे तिचा एकही डायलॉग नाही. तरीसुद्धा तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.
‘फॅंड्री’ चित्रपटामुळे तिला विषेश अशी ओळख मिळाली आहे. आता हीच सगळ्याची शालू सोशल मीडिवरया एक व्हिडीओच्या माध्यमातून धुमाकूळ घालत आहे. शालू नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वी तिने साडीमधील फोटो शेअर केला होता. राजेश्वरीचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप मोठ्या प्रमाणत आवडला आहे. त्या व्हिडीओमध्ये राजेश्वरी आपल्याला एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीने अटमगिरी हा चित्रपट केला होता. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही.
‘फँड्री’ या चित्रपटावेळी राजेश्वरी ही दहावीला शिकत होती. तसेच राजेश्वरी ही मुळची पुण्यातली आहे. तसेच आता ती अजून काही चित्रपटांसाठी काम करत आहे. ह्या अभिनेत्रीला अभिनयाचं कसलाही गंद नसताना ती अभिनय क्षेत्रात उतरली आहे.
राजश्री पुण्यात आपल्या आईवडिलांसोबत राहते. तिचे वडील बँकेत कामाला असतात. अभिनयाचं कसलाही वारसा नसताना तिने यात खूप नाव कमावले आहे. फँड्री चित्रपट करताना ती खूपच लहान होती. परंतु आता ती मोठी झाली असून ती पहिल्यापेक्षा आता खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
13 महिन्याच्या अयांशची मृत्यूशी झुंज; 16 कोटींचं औषधचं वाचवू शकतं त्याचा जीव
अमृता फडणवीसांचं नवीन गाणं सोशल मिडीयावर घालतंय धुमाकूळ; पहा व्हिडीओ
गॅस सिलेंडर धारकांना आणखी एक झटका! सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ
अबब… तब्बल 10 हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं!
‘….म्हणून तिने आत्मह.त्या केली’; पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्मह.त्येमागचं ध.क्कादायक कारण