मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) पडले. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्य नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले.
पण या नव्या सरकारची सुरुवात काही चांगली झाली नाही. ते सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. विरोधी पक्ष त्यांना नेहमी या ना त्या कारणावरुन धारेवर धरत आहेत.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला एकनाथ शिंदे गटाचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काम केले आहे. कुणी कोणाला गद्दार म्हणावे? पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या दोन खात्यांचा मी राज्यमंत्री होतो, असे देसाई म्हणाले.
मी त्यांचे काम जवळून पाहिले आहे. पण अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एकाच गोष्टीचा विचार करावा, हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे, असे देसाई म्हणाले.
आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाही किंवा आम्ही शिवसेना सोडली देखील नाही, असे देसाई म्हणाले. तसेच सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत, असे देखील देसाई म्हणाले.
अजित पवार सत्तेतून बाहेर फेकले गेल्यामुळे त्यांचे हे सर्व राजकारण सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीची काही मंडळी आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे त्यांची माणसे आमच्यासोबत येऊ नये, म्हणून ते आम्हाला गद्दार म्हणत असल्याचे देसाई म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
नाना पटोलेंची एकनाथ शिंदेवर मोठी टीका; म्हणाले, सध्याचे नवीन हिंदूहृद्यसम्राट…
अखेर अशोक गहलोत अध्यक्षपदाचे उमेदवार; आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण?
भाजपात प्रवेश करणार का? एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण
पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा; वाचा सविस्तर वृत्त
मुस्लिम नेत्यांच्या मोहन भागवत भेटीवर असदुद्दीन ओवेसी संतापले; म्हणाले, हे सर्व मुसलमान उच्चभ्रु …