लज्जास्पद! ‘माझ्या आईला वाचवा डॉक्टर’; मुलांच्या आर्त हाकेनंतरही डॉक्टरनं उपचार नाही केला; व्हिडीओ व्हायरल

पाटणा | जवळपास गेल्या वर्षभरापूर्वीपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. जगातील लाखो लोकांनी या महामरीमुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतात देखील कोरोनामुळे मृतांचा आकडा 2 लाखकडे गेला आहे. सर्वत्रच अगदी भयाण परिस्थिती झाली आहे.

भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतोय. काही राज्यांमध्ये तर कोरोना रुग्णांसाठी बेड देखील शिल्लक नाहीत. कोरोना काळात फ्रंट लाईनवर काम करणारे कोव्हीड योद्धे आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. मात्र, या काळात काही डॉक्टरांचे घाणेरडे चेहरे देखील समोर येत आहेत.

सध्या असाच एका डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डॉक्टरची रात्री झोपमोड झाल्याने त्याने रुग्णावर उपचार तर केलेच नाहीत. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांना शिव्यांसह धमक्या देखील दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ जबलपूर जिल्ह्यातील व्हिक्टोरिया रुग्णालयातील असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करणाऱ्या या डॉक्टरचं नाव भरत दुबे असं आहे.

माहितीनुसार, महिला रुग्णाची तब्येत अचानक खालावल्याने रुग्णाचे नातेवाईक महिलेला व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर देखील त्यांना एकंही डॉक्टर दिसला नाही. त्यानंतर रुग्ण महिलेच्या नातेवाईकांना समजलं की नाईट ड्युटीसाठी असणारे दुबे डॉक्टर झोप घेत आहेत.

यानंतर नातेवाईकांनी दुबे डॉक्टरला उठवले तर डॉक्टर त्यांच्यावर चांगलेच रागवले. झोपमोड झाल्याने दुबेंनी नातेवाईकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रुग्णावर उपचार करणे तर दूरंच. मात्र, दुबे रुग्णांसह नातेवाईकांना धमक्या देऊ लागले. त्यांनी रुग्णाकडे पाहिलं देखील नाही.

रुग्ण महिलेचा मुलगा आणि मुलगी डॉक्टरला हात जोडून विनंती करत होते की, एकदा रुग्णाला तपासा. पण डॉक्टरांनी कोणाचंही ऐकलं नाही ते रुग्णाच्या नातेवाईकांनाच ओरडू लागले आणि रुग्णाला तपासण्यास साफ नकार दिला. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केली होती.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. लोक यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

भर रस्त्यात चालू कारमधून बाळ खाली पडलं, आई मात्र गाडी चालवत पुढे गेली अन् मग…; पाहा व्हिडीओ

‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्रीनं केला साखरपूडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भिक मागावी लागते याला…

‘दोस्ताना 2’च्या वादानंतर करण जोहरनं सोशल मीडियावरुन…

IPL 2021: हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक, मुंबईचा 13 धावांनी…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy