नवी दिल्ली | जगविख्यात फिरकीपटू शेन वाॅर्नचं ह्रद्यविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. शेन वाॅर्न यांचं वयाच्या 52 व्या वर्षी थायलंडमध्ये निधन झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे.
क्रिकेटच्या दुनियेतील दिग्गज स्पिनर म्हणून शेन वाॅर्नला ओळखलं जातं. आपल्या बोटाच्या करामती दाखवत अलगद फलंदाजांना जाळ्यात अडकवण्याचं अफलातून कसब वाॅर्नकडे होतं.
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जास्त आवडती फलंदाज आणि गोलंदाजाची जुगलबंदी शेन वाॅर्न आणि सचिन तेंडूलकर यांच्यात रंगत होती. दोघांच्या क्रिकेटच्या मैदानातील कथा सर्वत्र प्रसिद्ध आहेत.
1998-99 मध्ये भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान वनडे मालिका चालू होती. शाहजाहच्या मैदानावर सचिन तेंडूलकर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची परीक्षा घेत होता. त्या मालिकेत सचिननं सर्वांना थकवलं होतं.
सचिनची अप्रतिम फलंदाजी पाहून सर्वजण हैराण झाले होते. तेव्हा शेन वाॅर्ननं देखील सचिनचं कौतूक केलं होतं. मी बेडवर झोपायला गेलो की मला सचिन माझ्या डोक्यावरून सिक्स मारत असल्याचं स्वप्न पडत होतं, असं शेन वाॅर्न यांनी म्हटलं होतं.
माझ्या मते डाॅन ब्रॅडमन यांच्यासह सचिन सोडून कोणताच फलंदाज इतका अप्रतिम खेळत नाही. सचिन एक महान फलंदाज असल्याचं मत वाॅर्न यांनी व्यक्त केलं होतं. वाॅर्न यांच्या जाण्यानं क्रिकेटची मोठी हानी झाली आहे.
1969 मध्ये ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये शेन वाॅर्न यांचा जन्म झाला होता. भारताविरोधात सिडनी कसोटी सामन्यात त्यांनी आपल्या कसोटी काराकिर्दीला सुरूवात केली होती.
दरम्यान, वाॅर्न यांना भारतीय लोकांबद्दल प्रचंड आस्था होती. भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली हा सध्याचा त्यांचा आवडता फलंदाज होता. वाॅर्न यांनी विराटच्या फलंदाजीचं अनेकदा कौतूक केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीनं केलं ट्रॅफिक जॅम! भर रस्त्यात उभी केली बस अन्…; पाहा व्हिडीओ
“भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवा”
ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू”
घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर