नवी दिल्ली | कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस आणि प्रशासनाने केली होती. मात्र सर्व विरोध झुगारुन देत येथील महिलांनी निर्धाराने हे आंदोलन सुरू ठेवलं होतं.
आज सकाळी दिल्ली पोलिसांनी शाहीनबाग येथे दाखल होत आंदोलकांना घटनास्थळावरून हटवलं. तसेच आंदोलकांचे साहित्यही हटवलं.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू होतो. आंदोलन सुरू झाल्यापासून सरकार आणि आंदोलकांकडून ताठर भूमिका घेण्यात आल्याने हे आंदोलन सुमारे तीन महिन्यांपर्यंत लांबलं होतं.
दरम्यान, दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी ही विनंती धुडकावून लावली होती.
महत्वाच्या बातम्या-
-पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ
-मध्य प्रदेशात सत्तापालट; शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान
-“आता रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गय करणार नाही… सगळं तुमच्यासाठीच चाललंय एवढंही कळू नये”
-“आत्ताच्या परिस्थितीत घरी राहणं हेच देशासाठी मोठं योगदान”
-जिथून कोरोनाची सुरुवात झाली तिथून आली आनंदाची बातमी