दाद्या मारायलाय…! शंकरपाळ्यानंतर आता महाराष्ट्राला वेड लावणारं बारकाल्या पोरांचं भांडण व्हायरल

मुंबई | काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social media) शंकरपाळ्याचा व्हिडीओ तुफान (Viral Video) व्हायरल झाला होता. शंकरपाळ्या नावाचा हॅशटॅग सध्या वापरला जात आहे.

शंकरपाळ्या मुलाच्या डायलॉगवर मीम्स बनवू लागले आहेत. अशातच आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ बीडचा असल्याचं सांगितलं जातंय. यात दोन बारक्याली पोरं भांडताना दिसत आहे. श्रेयस मिरगे आणि आयूष मिरगे अशी या दोघांची नावं आहेत.

दोघेही सख्खे चुलत भाऊ भांडत असताना तिसरा एक जण भांडणं सोडवण्यासाठी जातो. त्यावेळी त्याला देखील चांगलाच चोप मिळाल्याचं दिसून आलं.

दुकानातून सुपारी घेऊन आल्यानंतर श्रेयस आपल्या घरी निघाला होता. त्यानंतर त्याच्या चुलत भावामध्ये हा राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

महत्त्वाच्या बातम्या – 

NCC उमेदवारांसाठी खुशखबर! पोलीस भरतीसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“कोण कोणासोबत झोपतो हे…”, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली

Health Tips For Summer: कडक उन्हाळ्यात ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा… शरीराला आराम मिळेल

स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या प्रदीपचं आनंद महिंद्रांनी केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

Knee pain: कमी वयातच गुडघे दुखतात का?, ही लक्षणं दिसताच वेळीच सावध व्हा