‘परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या आणि…’; शरद पवारांचा केंद्र सरकारला मोलाचा सल्ला

मुंबई | युक्रेनमध्ये अजूनही हजारो विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारताच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतीयांकडून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या घटनेवर संवेदना व्यक्त करत केंद्र सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे.

युक्रेनच्या पूर्वेकडील खार्किव्ह शहरात गोळीबाराच्या हल्ल्यात आपला जीव गमावलेला आमचा भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा याच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना, असं पवार म्हणालेत.

आमचे हजारो विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये कठोर हवामानात आणि अन्नाशिवाय अडकले आहेत. मी केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य, ​​या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि चिंता समजून घ्या. अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने पावलं टाकली पाहिजे, असंही शरद पवारांनी म्हटलंय.

रशियन सैन्याकडून सुरु असलेल्या या हल्ल्यात नवीन शेखरप्पाचा मृत्यू झाला आहे. तो मुळचा कर्नाटकचा होता. नवीनच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

त्याने दोन दिवसांपूर्वीच आपल्या वडिलांशी व्हिडीओ कॉलवर बातचित केली होती. त्यांच्या व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं. तसेच मोदींनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला सर्व वरिष्ठ मंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

मलिकांच्या अटकेला धार्मिक रंग! बाळासाहेबांच्या वाक्याचा दाखला देत चंद्रकांत पाटील म्हणाले… 

रशिया-युक्रेन युद्धात Elon Muskची उडी; आता ‘या’ देशाला मदत करणार

“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”

युरोपियन संसदेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट थांबेना; पाहा व्हिडीओ

पोस्टाची भन्नाट योजना! खातं उघडल्यावर मिळणार दरमहा ‘इतके’ हजार रूपये