मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या पक्षांना आता आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. एकापाठोपाठ एक पक्षातील ज्येष्ठ, विश्वासू नेत्यांच्या भाजप-शिवसेना प्रवेशामुळे विशेषतः राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे.
विधानसभेच्या दृष्टीने आता पक्षातील वातावरण देखील तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टिका सुरु आहे. भाजपमध्ये वाढलेल्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांनी आता राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
‘भाजपमधील वाढते इनकमिंग पाहता आता थोड्याच दिवसांत शरद पवार आणि अजित पवार देखील येतील कि काय ? अशी शंका वाटायला लागली आहे’, असे विधान कर्डीले यांनी केले आहे. अहमदनगरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अहमदनगर येथील याच कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी देखील राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.’राष्ट्रवादीच्या वाताहतीला राष्ट्रवादीच जबाबदार आहे’, अशी बोचरी टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
प्रत्येकाला जमिनीवर आणण्याचे काम विखे-पाटील घराण्याने केले आहे. ज्यांनी-ज्यांनी मला त्रास दिला त्यांना त्यांना पुढच्या एका महिन्यात तो व्याजासह परत करेन’, असा इशारा देत सुजय विखे पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नागपूर दौरा रद्द – https://t.co/SjNlbqglrd @narendramodi @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
“पक्ष सोडणाऱ्यांचा शरद पवारांना राग येणं स्वाभाविकच” – https://t.co/lnSJv3xzPt @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे ‘हे’ सात उमेदवार निश्चित! – https://t.co/bpxHO5N2RC @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019