शरद पवारांची मैदानात एन्ट्री; पाकिस्तानचं आता काही खरं नाही!

आशिया कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु आहे. दोन्ही संघ खूप दिवसांनी एकमेकांसमोर उभे ठाकल्याने या सामन्यात रंगत चढली आहे. या सामन्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. शरद पवार यांनी मैदानात एन्ट्री मारताच सोशल मीडियात यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अत्यंत विनोदी प्रतिक्रियाचा पाऊस पडत असून आता पाकिस्तानचं काही खरं नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याआधी दोन्ही संघ रांगेत उभे होते. त्यावेळी शरद पवार यांनी मैदानात एन्ट्री मारली. त्यांच्या एन्ट्रीसोबत सोशल मीडियावर चर्चांना एकच उधाण आलं. भारत आता नक्की जिंकणार, अशा आशयाच्या चर्चा नेटिझन्समध्ये रंगायला सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावरील निवडक प्रतिक्रिया-

https://twitter.com/s_akhde/status/1042382218050633728

 

हाँगकाँगने भारताला झुंजवलं होतं-

पाकिस्तानआधी कालच भारताचा सामना हाँगकाँगसोबत रंगला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला 285 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर पहिल्या 30 षटकात हाँगकाँगची एकही विकेट पडली नव्हती. त्यामुळे भारतीयांच्या मनात धडकी भरली होती. अखेर 26 धावांनी भारताला विजय मिळाला आणि भारतीयांचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ चांगलाच गांभीर्याने मैदानात उतरला आहे.