बीड | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज बीडमध्ये त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी नावांची घोषणा केली. परळीमधून धनंजय मुंडे गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके यांच्या नावाची घोषणा शरद पवारांनी केली आहे.
विधानसभेसाठीची पहिली यादी पवारांनी जाहीर केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
ज्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, त्या परळी मतदारसंघातून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे परळीमध्ये भाजपकडून पंकजा मुंडेंच्या नावाची घोषणा झाल्यास विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत पुन्हा एकदा पहायला मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळेच पक्ष तयारीला लागलेत. राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर झाल्याने बीड जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपुर्वी बरेच मोठे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आहेत. मात्र पवारांनी उमेदवार जाहीर करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाजनादेश यात्रा चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात; रस्त्यावर मात्र शुकशुकाट https://t.co/yRR9bn5jhq @ChDadaPatil #MahaJanadeshYatra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
राणा पाटलांचा भाजपप्रवेश हा त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी झालाय; धनंजय मुंडेंची टीका https://t.co/JlHvd2cxdF @dhananjay_munde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
अन्यथा मी तुमचं पितळ उघडं पडतो…. ; धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज! https://t.co/6guLVXChhi @dhananjay_munde @Dev_Fadnavis #Nanar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019