…पण आम्ही कधीच तुरुंगात गेलो नाही; पवारांचा अमित शहांना टोला

सोलापूर : मागील मोठ्या काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाल्याने अखेर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज 17 सप्टेंबर ते सोलापूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर सडकून टीका केली.

पवारांना काय काम केलं या भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रश्नालाही शरद पवारांनी उत्तर दिलं. जे काही केलं ते बरं वाईट केलं, मात्र कधीही तुरुंगात गेलो नाही, असं म्हणत पवारांनी शाहांना टोला लगावला.

सोलापूर या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतात, असं म्हणत त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही लक्ष्य केलं.

पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उजडणाऱ्यांची काळजी घेऊ, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

सोलापूरमध्ये इतिहास घडवू. सत्ता येते जाते, त्याची काळजी नाही. मी 52 वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा विक्रम आहे. जनतेमुळे इतके यश प्राप्त झाले. त्यामुळे यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच, असाही विश्वास पवारांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-