‘…त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं’; शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई | राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या ‘उत्तर’ सभेमध्ये त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. सभेत राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फुले-शाहू-आंबेडकरांचा उल्लेख केला जातो, असा आरोप राज ठाकरेंना केला. पण त्याचा अभिमान आहे मला. फुले, आंबेडकर, शाहू महाराज हे शिवचरित्राबद्दल अतीव आस्था असलेले घटक आहेत. महाराजांबद्दलच्या आस्थेचा विचार करून हातातल्या सत्तेचा वापर कसा करावा, याबाबत भूमिका या तिघांनी मांडली, असं सांगत पवारांनी राज यांना प्रत्युत्तर दिलंय.

शिवाजी महाराजांचं नाव मी कधी घेत नाही. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीला होतो. तुम्ही माझं अमरावतीचं भाषण मागवलं, तर शिवाजी महाराजांच्या योगदानावर माझं किमान 25 मिनिटांचं भाषण होतं असं शरद पवारांनी सांगितलं.

सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचण्याची माझी सवय आहे. पण त्यासाठी मला सकाळी उठावं लागतं. सकाळी त्यांनी काय लिहिलंय, हे न वाचता त्यांनी वक्तव्य केलं असेल, तर मी त्यांना दोष देणार नाही, असा टोला शदद पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

वर्ष-सहा महिन्यात एखादं वाक्य बोलून आपलं मत व्यक्त करत असतात. पण ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज नसते, असंही पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल 

‘काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे’; पंकजा मुंडेंचा भावाला प्रेमाचा सल्ला 

राज्यातील ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

…अन् मॅच सुरू असताना टॉपलेस होऊन मैदानात घुसली महिला, पाहा व्हिडीओ 

“राज ठाकरेंनी स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा घ्याव्यात”