पुणे महाराष्ट्र

शरद पवार एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होणार; पहा कुणी केली भविष्यवाणी…

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होणार, अशी भविष्यवाणी खुद्द बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे.

शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा होती. मात्र पंतप्रधानपदाने त्यांना वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. आता शरद पवार स्वतः पंतप्रधानपदाचे दावेदार नसल्याचं सांगत आहेत. 

पवार खुद्द पंतप्रधानपदाचे दावेदार नसल्याचं सांगत असले तरी त्यांचे मित्र आणि सहकारी मात्र ते पंतप्रधान होतील अशी आशा बाळगून आहेत. पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत ही सर्वांचीच इच्छा आहे. ते एक दिवस नक्की भारताचे पंतप्रधान होणार. ही माझी वाणी आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, जेव्हा ही वाणी खरी ठरेल तेव्हा तुम्ही सर्व साक्षीदार असाल, असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे डी. वाय. पाटील यांच्या भविष्यवाणीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. 

IMPIMP