शरद पवारांसमोर ईडी नमलं की काय???; चौकशीची गरज नसल्याचे पवारांना पत्र

मुंबई : ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. ईडी प्रकरणात नाव आल्यामुळे आता नोटीस आलेली नसताना शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार होते. मात्र आता ईडीने मेल पाठवत तुम्हाला तुर्तास चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याच्या बातम्या समोर आल्या. ईडीनेही हे वृत्त फेटाळलं नाही. ज्या बँकेचे शरद पवार कधीही संचालक नव्हते, त्या बँकेतील घोटाळ्याबाबत त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला, असं म्हणत राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

शरद पवार अद्यापही ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलाम लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ईडी जरी म्हणत असेल चौकशीची आताच गरज नाही तरीही शरद पवार ईडी कार्यालयात जाऊन या प्रकरणाबाबत माहिती घेतील, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे. शरद पवार यांचं या घोटाळ्यात कधीही नाव आलं नव्हतं, मग आता गुन्हा का दाखल करण्यात आला, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-