भीमा कोरेगावप्रकरणात शरद पवार यांची साक्ष होणार

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भीमा कोरेगाव प्रकरणी साक्षीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

शरद पवारांनी अनेकदा माध्यमांसमोर भीमा कोरेगाव प्रकरणाची आपल्याकडे महत्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आता चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन पटेल यांनी या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

आयोगाचं चौकशीचं वेळापत्रक ठरलेलं नसलं, तरी शरद पवार यांना लवकरच साक्षीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. कारण चौकशी आयोगाला अल्पमुदतवाढ मिळाली आहे.

दरम्यान, केवळ तीन महिन्यांच्या मुदतवाढीपैकी आयोगाचा एक महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचं कामकाज होऊ शकतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-फक्त सरपंचच नाही तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून पाहिजे; अण्णा हजारेंची मागणी

-‘कर्ज फिटलं साहेब, पोरीच्या लग्नाला या’; अजितदादांचा आपुलकीचा प्रश्न… कुठं दिलं लेकीला?

-अजित पवार यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी

-70 वर्ष काय केलं? हा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रम्प यांनी भाषणातून उत्तर दिलंय- अशोक चव्हाण

-….म्हणून ट्रम्प यांची मी निंदा करतो; त्यांनी त्वरीत माफी मागावी- जितेंद्र आव्हाड