महाराष्ट्र मुंबई

साथ सोडलेल्यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी आखली ‘ही’ मोठी रणनीती!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असतात. पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना चितपट करण्यासाठी पक्षाध्यक्षांनी नवी रणनीती आखल्याचं दिसतंय.

पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची शरद पवारांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून आगामी विधानसभा निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रावादीही भाजपचीच शैली अवलंबणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

राष्ट्रवादीला सोडणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघातील सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतोय का? याच्या चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरु आहे. 

भाजपमधील कोण आयाराम आहेत आणि पक्षातील कोणतं तरुण नेतृत्व गेलेल्या पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची नाकेबंदी करु शकतात. हेदेखील युद्धपातळीवर शोधण्याचं काम राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून सुरु आहे.

मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे विरोधातील स्थानिक नेतृत्वात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा नेत्यांशी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते संपर्कात आहेत. 

दुसरीकडे जालन्याचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कुजबुज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानी पडली आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांकडून काही दगाफटका झालाच तर त्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेशही पक्ष नेतृत्वाने दिले असल्याचं समजतंय.

सोलापूरमधून आमदार बबन शिंदे आणि दिलीप सोपल यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला गैरहजेरी लावल्याने हे दोन नेते राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र असं झालंच तर त्यांच्या विरोधात तो़डीस तोड उमेदवार शोधला आहे, असंही राष्ट्रवादीचे नेते सांगत आलं आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-राजीनामा देण्याअगोदर चित्रा वाघ माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या….- शरद पवार

-‘हे’ पाच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीसोबतच; शरद पवारांचा दावा

-गद्दारीने परतफेड करण्याचा इतिहास आलाय- जितेंद्र आव्हाड

-राष्ट्रवादीचा हा मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार!

-राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार म्हणतो मी पवारांसोबतच राहणार; ‘कोणाच्याही संपर्कात नाही’

IMPIMP