नारायण राणेंचं आमंत्रण शरद पवारांनी स्विकारलं!

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ या आत्मचरित्राचे 16 जुलैला प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

नारायण राणेंच्या या आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीला शरद पवार यांनी प्रस्तावना लिहली आहेे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या पुस्तक प्रकाशनाला वेळ दिला नाही, मात्र शरद पवार उपस्थितीत राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरु असलेल्या या सर्व प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चां रंगत आहेत.

नारायण राणेंनी शिवसेना का सोडली त्याचं कारण आत्मचरित्रातून उलगडणार असल्याचं राणेंनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर आत्मचरित्राद्वारे अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला जाईल, असंही सांगितलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच वैयक्तिक वाद नाहीत तर फक्त वैचारिक वाद आहेत. उद्धव ठाकरेंनी लोकांना किती त्रास दिला हेदेखील आपल्या आत्मचरित्रात लिहलं असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं आहे. 

 नारायण राणेंनी आघाडीची सत्ता असताना 2005 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान या नव्या पक्षाची स्थापना केली. आता ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत खासदार आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-‘मला पक्षात येण्यासाठी सारखं बोलावणं येतंय’; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

-बारामतीत घुमणार मुख्यमंत्री फडणवीसांचा आवाज!

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते; संजय राऊतांनी मारला शालजोडीतून टोला

-राज ठाकरेंचं ‘मिशन विधानसभा’; या मुद्द्यावर घेणार ममता बॅनर्जींची भेट!

-पुण्यातील गहुंजे बलात्कारप्रकरणातील नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप